UPSC Success Story : वडिलांच्या निधनानंतरही संकटाशी जिद्दीने लढा; दिव्या तंवरने एकदा नव्हे तर दोनदा केली UPSC क्रॅक

Rashmi Mane

UPSC चं स्वप्न!

UPSC परीक्षा देशातील सर्वात अवघड मानली जाते. या परीक्षेत यश मिळवून आयएएस आणि आयपीएस होण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात.

Divya Tanwar | Sarkarnama

हरियाणातील मुलगी

कठोर मेहनत आणि चिकाटीने हे स्वप्न पूर्ण करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हरियाणातील दिव्या तंवर.

Divya Tanwar | Sarkarnama

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

दिव्या यांनी एकदा नाही तर दोनदा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया रँक 438 मिळवत 21 व्या वर्षी आयपीएस अधिकारी बनून दाखवले.

Divya Tanwar | Sarkarnama

स्वप्न साकार

त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी 2022 मध्ये 105 वा क्रमांक मिळवला आणि आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्नही साकार केले.

Divya Tanwar | Sarkarnama

कठीण परिस्थितीवर मात

हरियाणातील महेंद्रगढ जिल्ह्यातील निंबी गाव हे दिव्या तंवर यांचे मूळ गाव आहे. 2011 मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवर आली. आर्थिक अडचणी असूनही आईने शेतमजुरी आणि शिलाईचे काम करून दिव्या यांचे शिक्षण सुरू ठेवले.

Divya Tanwar | Sarkarnama

कोचिंगशिवाय UPSC

दिव्या यांनी आपल्या मेहनतीने कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता त्यांनी ऑनलाइन क्लासेस, टेस्ट सीरीज आणि मॉक टेस्टद्वारे तयारी केली. हाच त्यांचा यशाचा मंत्र ठरला.

Divya Tanwar | Sarkarnama

शिक्षण आणि तयारी

दिव्या यांनी सुरुवातीचे शिक्षण सरकारी शाळेतून घेतले. त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला आणि पुढे सायन्समधून पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

Divya Tanwar | Sarkarnama

प्रेरणादायी प्रवास

कठीण परिस्थिती, कोचिंगशिवाय UPSC तयारी, आणि जिद्द यामुळे दिव्या तंवर आज लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहेत.

Divya Tanwar | Sarkarnama

Next : लाडकी बहीण योजनेतून सव्वा लाख अर्ज बाद; यात तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक!

येथे क्लिक करा