Deepak Kulkarni
पुणे पोलिसांनी दिवाळीतील फटाके फोडण्यासंबंधीची नवी नियमावली जाहीर केली आहे.
पुणे शहरातील सार्वजनिक रस्ते, फूटपाथ अथवा रस्त्यापासून 10 मीटरच्या आत फटाके फोडणं महागात पडणार आहे.
पुणे पोलिसांच्या नियमावलीतील ठिकाणी फटाके फोडल्यास थेट गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.
शहरात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जास्त आवाज करणाऱ्या फटाक्यांवर संपूर्ण बंदी असणार आहे. मात्र, या काळात पारंपारिक फटाक्यांच्या तुलनेत कमी प्रदूषण करणारे, कमी आवाजाचे आणि आकर्षक रंगाचे 'ग्रीन क्रॅकर्स' वापरता येणार आहे.
पुणे पोलिसांनी रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि न्यायालये यांच्यापासून 100 मीटरच्या परिसराला 'सायलेन्स झोन' घोषित केली असून, त्याठिकाणी फटाके फोडण्यास सक्त मनाई असणार आहे.
पोलिसांच्या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या स्फोटके कायदा 1884 आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांनुसार गुन्हे दाखल केले जाणार आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी शहरात कोठेही नियमावलीचं पालन होत नसेल तर नागरिकांना तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे. या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच पुणे पोलिसांनी शहरातील फटाक्यांच्या विक्री आणि वापराबाबत कडक नियम जारी केले आहेत.