Deepak Kulkarni
दिवाळी हा सण सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. त्यामुळे कामानिमित्त कुटुंबापासून दूर असलेल्या प्रत्येकाची दिवाळीसाठी घरी जाण्यासाठी धडपड सुरू असते.
मात्र,दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वेच्या गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे.
त्यामुळे खासगी बसचालकांकडून दिवाळीसाठी गावी जात असलेल्या प्रवाशांसाठी नेहमीच्या दराच्या तिप्पट भाडेवाढ सुरू केली आहे.
एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी जादाच्या बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. पण त्या बसेसचं बुकिंग फुल्ल झाल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
याचाच गैरफायदा घेत खासगी बसचालकांकडून मनमानी कारभार सुरू असून नियमित तिकिटापेक्षा दुप्पट,तिप्पट, चौपट अशाप्रमाणात वाढ केल्याचा अनुभव काही प्रवाशांना येत आहे.
मराठवाडा,विदर्भ,खान्देश,पश्चिम महाराष्ट्र,कोकण अशा ठिकाणी दिवाळीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता पुणे आरटीओनं प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने आता या दिवाळी सणाच्या कालावधीत अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करणाऱ्यांविरोधात कडक पाऊल उचललं आहे.
आता पुणे RTO नं रिक्षा, कॅब आणि खासगी बसचालकांच्या विरोधात तक्रार नवा संपर्क क्रमांक जाहीर केला आहे.
कोणत्याही प्रवाशांची लूटमार होत असेल तर पुणे प्रादेशिक परिवहन विभागानं (आरटीओ) 8275330101 या व्हॉट्स अॅप क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेत RTO संबंधितांवर कठोर कारवाई करणार आहे.