Ganesh Sonawane
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'क्यू आर कोड संवाद माध्यम' या अभिनव उपक्रमाची सुरुवात दिंडोरीत करण्यात आली आहे.
नागरिकांचे प्रश्न थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचावेत आणि समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे हा यामागील उद्देश आहे.
या माध्यमातून नागरिकांना मोबाईल माध्यमातून थेट मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
युवानेते गोकुळ झिरवाळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला आहे.
नागरिकांना विविध विषयांवरील प्रश्न, सूचना, समस्या अथवा विभागनिहाय अडचणी क्यू आर कोड स्कॅन करून ऑनलाईन फॉर्मद्वारे मांडता येणार आहेत.
या फॉर्ममध्ये नागरिक आपली समस्या, संबंधित विभाग आणि सूचना नमूद करू शकतील.
त्यानंतर सदर माहिती थेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मोबाईलवर पोहोचणार असून ते स्वतः त्याचा पाठपुरावा करतील.
या उपक्रमामुळे नागरिकांचा थेट संवाद मंत्र्यांशी साधला जाणार असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होईल, अशी अपेक्षा आहे.