Rashmi Mane
शुक्रवारी राजस्थानच्या जयपूरमध्ये शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्या मुली आणि मुलांनीही सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे CM भजनलाल शर्मा यांची उपस्थिती होती.
मुलगा लक्षराज सिंह, मुलगी गौरवी कुमारी आणि मुलगा पद्मनाभ सिंह यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.
दिया कुमारींचा मोठा मुलगा पद्मनाभ सिंग हा पोलो खेळाडू आहे, तर धाकटा मुलगा लक्षराज सिंग सध्या शिक्षण घेत आहे.
दिया कुमारी यांनी यंदा विद्याधर नगर मतदारसंघातून 1,58,516 मते मिळवून प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे.
दिया कुमारी यांनी 10 वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला होता आणि सवाई माधोपूरमधून त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
दिया कुमारी यांनी निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सीताराम अग्रवाल यांचा ७१,००० हून अधिक मतांनी पराभव केला आहे. त्या सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या भाजपच्या आमदार आहेत.
जयपूरमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात दिया कुमारी यांनी शपथ घेतली यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.