Rajanand More
काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून बुधवारी (ता. ३) शपथ घेतील. पण त्याआधीच त्यांनी सात वर्षांपूर्वी घेतलेल्या एका शपथेची चर्चा सुरू झाली.
2019 मध्ये शिवकुमार यांना ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी जवळपास ५० दिवस ते तुरुंगात होते.
शिवकुमार यांना अटक झाल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी थेट तिहार तुरुंगात जाऊन त्यांची भेट घेतली होती. ही भेट त्यावेळी चांगलीच चर्चेत आली होती.
५० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर शिवकुमार बाहेर आले तेव्हा त्यांचा लूक बदलला होता. तुरुंगात जाण्याआधी ते नेहमीच क्लीन शेव्हमध्ये दिसायचे. पण तुरुंगात परतले तेव्हा त्यांती दाढी वाढली होती.
तुरुंगात असतानाच शिवकुमार यांनी कर्नाटकचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दाढी करणार नाही, अशी शपथ घेतली होती. आता ३ जूनला ते मुख्यमंत्री होणार आहेत.
शिवकुमार यांची शपथ पूर्ण होत असल्याने ते आता जुन्या लुकमध्ये येणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. हे पुढील दोन दिवसांत स्पष्ट होईल.
शिवकुमार यांनी आपला शपथविधी साधेपणाने होईल, असे स्पष्ट केले आहे. वाहतूक कोंडीचा त्रास लोकांना होऊ नये, यासाठी लोकभवनातच आपण शपथ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवकुमार यांना काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले. पक्ष अडचणीत असताना त्यांनी पक्षाला वाचविले आहे. देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणूनही आता त्यांची ओळख होणार आहे.