Rajanand More
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी गुरूवारी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याजागी डी. के. शिवकुमार हे लवकरच या पदाची शपथ घेतील.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सिध्दरामय्या यांना राज्यसभेवर जाण्याची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी राज्यसभेत जाणार नसल्याचे सांगत राज्याच्याच राजकारणात अखेरपर्यंत सक्रीय राहणार असल्याचे स्पष्ट केले.
सिध्दरामय्या यांनी स्वत:साठीही काहीही मागितले नसले तरी पुत्र यतिंद्र यांच्यासाठी जोरदार फिल्डींग लावल्याची चर्चा आहे. राजीनामा दिल्यानंतर लगेच दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी राहुल गांधींसमोर आपल्या मागण्या ठेवल्याचे समजते.
पुत्र यतिंद्र यांना सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद देण्याची मागणी सिध्दरामय्या यांनी केल्याची चर्चा आहे. इतर काही नेतेही या पदासाठी उत्सुक आहेत.
काँग्रेसकडून ही मागणी मान्य केली जाण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना नाराज करणे पक्षाला परवडणारे नाही.
यतिंद्र सिध्दरामय्या हे सध्या विधानपरिषदेचे आमदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून मोठ्या बंधूच्या आकस्मिक निधनानंतर ते राजकारणात सक्रीय झाले.
यतिंद्र हे २०१८ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. ते वरुणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. तेव्हापासून त्यांचा काँग्रेसमधील सक्रीय सहभाग वाढला.
२०२३ च्या निवडणुकीत त्यांनी वडिलांसाठी हा मतदारसंघ सोडला. सिध्दरामय्या यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढली. तर यतिंद्र यांना विधानपरिषदेत पाठविले.