DK Shivakumar Karnataka CM : मुख्यमंत्री कारकीर्दला महिना पूर्ण; DK शिवकुमार यांचे धडाकेबाज निर्णय!

Pradeep Pendhare

धडाकेबाज शिवकुमार

डीके शिवकुमार यांनी कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळून एक महिना होत आला आहे. या काळात त्यांनी घेतलेले निर्णय चर्चेत आले आहेत.

DK Shivakumar Karnataka CM | Sarkarnama

72 हजारांवर भरती

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत बसपास ते पुढील सहा महिन्यांत 72 हजार सरकारी पद भरती राबवण्याची योजना आहे.

DK Shivakumar Karnataka CM | Sarkarnama

भारत जोडो

राज्यातील सर्व पंचायती अन् प्रभागामध्ये ‘भारत जोडो युवा असोसिएशन’ची स्थापना अन् प्रत्येकी 10 लाख रुपये निधी देण्याचा निर्णय.

DK Shivakumar Karnataka CM | Sarkarnama

वीज जोडणी

2500 चौरस फुटांपर्यंतच्या नवीन निवासी इमारतींना कायमस्वरूपी वीज जोडणीसाठी ‘ओसी’ मधून सूट दिली आहे.DK Shivakumar Karnataka CM

DK Shivakumar Karnataka CM | Sarkarnama

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी प्रकल्प

राज्यभरात ‘बी’ खात्यांचे ‘ए’ खात्यात रूपांतर बंगळूरचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी दोन हजार कोटींचे प्रकल्पाची योजना जाहीर केली.

DK Shivakumar Karnataka CM | Sarkarnama

प्रजासेवा मंत्रालय

जनतेच्या तक्रारीसाठी ‘प्रजासेवा’ नावाचे स्वतंत्र मंत्रालयबरोबरच राजकीय दबावाला बळी न पडता कायदेशीर चौकटीत काम करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

DK Shivakumar Karnataka CM | Sarkarnama

कर्नाटकसाठी पंचहमी

पंचहमी योजना केवळ कर्नाटकच्या नागरिकांसाठीच उपलब्ध असाव्यात आणि त्यातील गळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

DK Shivakumar Karnataka CM | Sarkarnama

दिल्लीत कर्नाटक भवन

विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत ‘कर्नाटक भवन’ आणि राज्याचे हित जपण्यासाठी दिल्लीत निवृत्त आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करण्याचा योजना आहे.

DK Shivakumar Karnataka CM | Sarkarnama

शेतकरी ते पर्यटन

शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते पुरवण्याचे निर्देशाबरोबरच किनारपट्टीवरील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहे.

DK Shivakumar Karnataka CM | Sarkarnama

'सर्वोच्च'मधील खटल्यांसाठी

सर्वोच्च न्यायालयात राज्याशी संबंधित विविध खटल्यांचे व्यवस्थापन आणि जलद निपटारा करण्यासाठी वकिलांचे पथक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.

DK Shivakumar Karnataka CM | Sarkarnama

NEXT : वारकरी 'चरण सेवा' उपक्रम

येथे क्लिक करा :