DK Shivakumar : मोदी, शहांशी पंगा घेणार नेता होणार मुख्यमंत्री! काँग्रेसमध्ये जन्म झाला, काँग्रेसमध्येच मरणारची केली होती गर्जना!

Roshan More

डी के शिवकुमार

विद्यार्थी काँग्रेसपासून आपल्या राजकारणाची सुरुवात करणारे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. सिद्धरामय्या यांच्या राजीनामनंतर ते मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील.

DK Shivakumar | sarkarnama

एनएसयूआई

विद्यार्थी दशेत ते काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या नेशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया (एनएसयूआई)चे अध्यक्ष होते.

DK Shivakumar | sarkarnama

पहिला पराभव

पहिल्या निवडणुकीत त्यांना एच डी देवैगौडा यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता. देवेगौडा हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत.

DK Shivakumar | sarkarnama

अपक्ष लढले अन् जिंकले

1991 मध्ये ते बंगारप्पा सरकारमध्ये मंत्री बनले. 1994 च्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आले. मात्र, त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढली आणि विजय मिळवला.

DK Shivakumar | sarkarnama

कुमारस्वामी यांचा पराभव

1999 मध्ये माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांच्या विरोधात निवडणूक लढत त्यांना पराभूत केले.

DK Shivakumar | sarkarnama

1989 पासून सदस्य

मागील 35 वर्षांपासून ते विधानसभेचे सदस्य आहेत. पहिल्यांदा ते 1989 पासून विधानसभेचे सदस्य आहेत.

DK Shivakumar | sarkarnama

मोदी, शहांशी पंगा

गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या सदस्यांना आपल्या हाॅटेलमध्ये ठेवत त्यांनी थेट नरेंद्र मोदी, अमित शाहांशी पंगा घेतला होता.

DK Shivakumar | sarkarnama

उपमुख्यमंत्री

2023 मध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी उपमुख्यमंत्रिपद डी के शिवकुमार यांना मिळाले होते. विधासभेत बोलताना ते म्हणाले होते की, माझा जन्म काँग्रेसमध्ये झाला आहे मी मरणार देखील काँग्रेसमध्येच.

DK Shivakumar | sarkarnama

NEXT : CM विजय यांनी PM मोदींची भेट घेताच 12 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल; काय आहे खास?

CM Vijay with PM Narendra Modi | Sarkarnama
येथे क्लिक करा