Dr Amol Kolhe : अजितदादांनी चॅलेंज दिलेले डॉक्टर, अभिनेते ते यशस्वी खासदार डॉ अमोल कोल्हे

Vijaykumar Dudhale

नारायणगाव येथे जन्म

डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे 18 सप्टेंबर 1980 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण नारायणगावमध्ये, तर त्यापुढील शिक्षण पुण्यात झाले. दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये ते गुणवत्ता यादीत आले होते.

Dr Amol Kolhe | Sarkarnama

वैद्यकीय शिक्षण मुंबईत

डॉ. कोल्हे यांचे वैद्यकीय शिक्षण मुंबईतील सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयात झाले.

Dr Amol Kolhe | Sarkarnama

'स्वराज्यरक्षक संभाजी'मुळे घराघरांत पोचले

राजा शिवछत्रपती मालिकेतून अमोल कोल्हे हे राज्यभर प्रसिद्ध झाले. पुढे स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे ते महाराष्ट्रातील घराघरांत पोचले.

Dr Amol Kolhe | Sarkarnama

पत्नी सहाय्यक प्राध्यापक

डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी अश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

Dr Amol Kolhe | Sarkarnama

घर विकून 'स्वराज्यरक्षक संभाजी'ची निर्मिती

छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपुढे यावा, यासाठी त्यांनी आपले राहते घर विकून स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेची निर्मिती केली.

Dr Amol Kolhe | Sarkarnama

शिवसेनेचे स्टार प्रचारक

डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेत 2014 पासून उपनेते म्हणून कार्यरत होते. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून शिवसेनेने त्यांची 2015 मध्ये नियुक्ती केली होती.

Dr Amol Kolhe | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

डॉ. अमोल कोल्हे यांनी 1 मार्च 2019 रोजी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर 2019 च्या निवडणुकीत डॉ. कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.

Dr Amol Kolhe | Sarkarnama

शरद पवार यांना साथ

राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते अजितदादांच्या शपथविधी सोहळ्याला हजर होते. मात्र, त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलत शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.

Dr Amol Kolhe | Sarkarnama

NEXT : चर्चा, खरेदी अन् मार्गदर्शन... 'भीमथडी' जत्रेत शरद पवारांचा उत्साही सहभाग