सरकारनामा ब्युरो
भारताच्या जडणघडणीत महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांचाही सिंहाचा वाटा आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का, महात्मा फुले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरूसमान होते.
फुले यांची विचारसरणी, सामाजिक सुधारणांचे प्रयत्न आणि शोषित वर्गाच्या उत्थानासाठीचे कार्य यांचा आंबेडकरांच्या जीवनावर आणि विचारांवर खोलवर प्रभाव पडला होता.
19 व्या शतकात फुले यांनी जातिव्यवस्था, महिला हक्क आणि शिक्षणाच्या क्षेत्रात उचललेली क्रांतिकारी पावले आंबेडकरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली.
आंबेडकरांनी गौतम बुद्ध आणि कबीर यांच्यासोबतच ज्योतिबा फुले यांनाही गुरूंपैकी एक मानले होते.
1954 च्या डायमंड जुबली समारंभात आंबेडकर म्हणाले होते, "मी गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांचा भक्त आहे. ज्ञान, स्वाभिमान आणि चारित्र्याचा उपासक आहे."
आंबेडकरांनी त्यांच्या "हू वेअर द शुद्र?" हे पुस्तकात महात्मा फुले यांना समर्पित केले आहे.
महात्मा फुले यांनी खालच्या जातींतील म्हणून हिणवले जाणाऱ्यांना जाणीव करून दिली की उच्च जातींचे गुलाम नाहीत.
यावरून असे दिसून येते की फुले यांच्या विचारांनी आंबेडकरांच्या जातीव्यवस्थेच्या वैचारिक बैठकीला आकार दिला.