Rajanand More
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये शेकडो लोकांचा जीव गेला होता. तहव्वूर राणा हा या हल्लामागचा मास्टरमाईंड आहे.
तहव्वूर राणाला गुरूवारी (ता. 10 एप्रिल) अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. तेथील कोर्टाने त्याच्या प्रत्यार्पणावर काही दिवसांपूर्वीच शिक्कामोर्तब केले.
तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण तसेच भारतात आणण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेतील दोन अधिकाऱ्यांची कामगिरी महत्वाची ठरली आहे.Ashish Batra, Jaya Roy
एनआयएचे महानिरीक्षक आशिष बात्रा आणि उपमहानिरीक्षक जया रॉय या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली.
आशिष बात्रा हे झारखंड केडरचे 1997 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी झारखंडमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
2019 मध्ये पाच वर्षांसाठी एनआयएमध्ये दाखल झाले. त्यानंतर दोन वर्षांसाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आली.
जया रॉय याही झारखंड केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या 2011 मध्ये या सेवेत दाखल झाल्या आहेत. जमतारा या गाजलेल्या सायबर गुन्ह्याची उकल त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली होती.
जया रॉय या 2019 मध्ये एनआयएमध्ये दाखल झाल्या. त्यांची नियुक्ती चार वर्षांसाठीच होती. पण गृह मंत्रालयाने दोन वर्षांचा कालावधी वाढवला.