Rashmi Mane
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतीयांवर परिणाम करणारा मोठा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या सिक्युरिटी विभागाने (U.S. Department of Homeland Security) जाहीर केले आहे की आता अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी नागरिकांना ऑटोमॅटिक वर्क परमिट एक्स्टेंशन मिळणार नाही. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारतीयांच्या नोकऱ्यांवर बसणार आहे.
आतापर्यंत जर कोणाचे वर्क परमिट संपले, तर त्याला आपोआप 540 दिवसांचे एक्स्टेंशन मिळायचे. त्या काळात अर्जदारांना नव्याने वर्क परमिट नूतनीकरण करता यायचे. पण आता हा नियम रद्द करण्यात आला आहे.
म्हणजे, जर कोणाचे वर्क परमिट उद्या संपत असेल, तर ते आज आपोआप वाढणार नाही. हा नियम अमेरिकन वेळेनुसार बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला असून, गुरुवारपासून लागू होणार आहे.
या निर्णयामुळे H-1B व्हिसा, H-4 व्हिसा (स्पाउस परमिट) किंवा STEM OPT (ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग) वर अमेरिकेत काम करणाऱ्या हजारो भारतीय व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.
तसेच, ज्यांनी ग्रीन कार्डसाठी अनेक वर्षे प्रतीक्षा केली आहे, त्यांना आता प्रत्येक वेळी वर्क परमिट उशिरा नूतनीकरण झाल्यास नोकरी गमावण्याचा धोका राहणार आहे.
USCIS डायरेक्टर जोसेफ एडलो म्हणाले “आमचं लक्ष आता राष्ट्रीय सुरक्षेवर आहे.
अमेरिकेत काम करणं हा अधिकार नव्हे, तर विशेषाधिकार आहे.
या निर्णयामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.