Rashmi Mane
वाहनधारकांसाठी एक नवा नियम लागू झाला आहे. KYV (Know Your Vehicle) म्हणजेच आपलं वाहन ओळखा! आता फास्टॅग असलेल्या सर्व वाहनधारकांना ही प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आली आहे.
1 नोव्हेंबर 2024 पासून KYV सर्व फास्टॅग वापरकर्त्यांसाठी बंधनकारक आहे.
जर तुम्ही KYV केलं नाही, तर तुमचा फास्टॅग आपोआप बंद होऊ शकतो!
KYV साठी वाहनाचा नंबर प्लेट आणि फास्टॅग दिसला पाहिजे असा समोरून फोटो. चाक/एक्सल दिसले पाहिजे असा वाहनाचा साइड फोटो. तसेच वाहनाची आरसी (RC) अपलोड करावी लागेल.
सरकारनं सांगितलं आहे की अनेक ठिकाणी फास्टॅगचा गैरवापर होत होता.
उदा. काही ट्रक ड्रायव्हर्स कमी टोलसाठी कारचा फास्टॅग वापरत होते. त्यामुळे आता KYVमुळे प्रत्येक टॅग एका वाहनाशीच जोडला जाईल “One Vehicle, One Tag”.
हा उपक्रम NHAI (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) चा आहे आणि तो NPCI मार्फत लागू करण्यात आला आहे. संपूर्ण प्रक्रिया वाहनांच्या VAHAN डेटाबेस शी जोडली गेली आहे.
ही प्रक्रिया एकदाच नाही! प्रत्येक तीन वर्षांनी पुन्हा वाहनाची तपासणी (re-verification) करावी लागेल, जेणेकरून माहिती अपडेट राहील.
सरकारचं म्हणणं आहे ही प्रक्रिया फास्टॅग प्रणाली सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्यासाठी आहे. लवकरच सर्व बँकांसाठी एकसमान पोर्टल आणि हेल्पलाइन सुरू करण्याचा विचार आहे.