Jagdish Patil
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांबाबत आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.
ट्रम्प यांनी H1B व्हिसासाठीच्या अर्जाची रक्कम तब्बल 1 लाख डॉलर्स म्हणजेच 88 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या या निर्णयाचा फटका अमेरिकेत राहणाऱ्या लाखो भारतीयांसह इतर परदेशी नागरिकांना बसणार आहे.
मात्र, अमेरिकेत राहण्यासाठी महत्वाचा मानला जाणारा H1-B व्हिसा एवढा मिळवण्यासाठी काय करावे लागते? ते जाणून घेऊया.
अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी हा व्हिसा गरजेचा असतो. कारण तो अमेरिकेत नोकरी करण्याचा परवाना मानला जातो.
IT, इंजिनिअरिंग, फायनान्स आणि मेडिकलसारख्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांमध्ये हा व्हिसा घेण्याची मोठी क्रेझ आहे.
हा व्हिसा सुरुवातीला 3 वर्षांसाठी दिला जातो आणि 6 वर्षांपर्यंत वाढवता येतो. ज्यांना ग्रीन कार्ड मिळाले आहे, त्यांना आपला व्हिसा अनिश्चित काळासाठी नूतनीकरण करता येतो.
यापूर्वी H-1B व्हिसासाठी वार्षिक शुल्क 1 ते 8 लाख रुपये होते, मात्र आता ते तब्बल 88 लाख करण्यात आले आहे.
H-1B व्हिसासाठी उमेदवार स्वतः अर्ज करू शकत नाही. यासाठी अमेरिकन कंपनीने स्पॉन्सर करणे आवश्यक असतं.
यासाठी उमेदवार कमीत कमी बॅचलर डिग्री किंवा त्यासमान शिक्षण घेतलेला असावा. तसंच ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, त्या विषयात डिग्री/अनुभव आवश्यक आहे.