Rashmi Mane
अनेक दिवसापासून जगाच्या नजरा असणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहास घडवला आहे.
बहुमताचा आकडा पार करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आले असून त्याचा पुण्याशीही विशेष संबंध आहे.
पुण्यातील कल्याणी नगर येथील मध्यवर्ती भागात असलेल्या "ट्रम्प टॉवर" ही भारतातील सर्वात महागड्या इमारतींपैकी एक आहे.
बॉलिवूड स्टार्सनी देखील या इमारतीमध्ये फ्लॅट घेतले आहेत. तर अनेक उद्योगपतींचेही या टॉवर्समध्ये फ्लॅट आहेत.
पंचशील ग्रुपचे मालक अतुल चोरडिया हे या प्रकल्पात ट्रम्प यांचे भागीदार आहेत.
चोरडियांचे ट्रम्प यांच्याशी असलेल्या भागीदारीमुळेच ट्रम्प टॉवरचे 23 मजली दोन ट्विन टॉवर्स पुण्यात उभारले गेले, अमेरिकेतून मागवण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या काचेमुळे हे टॉवर्स वैशिष्ट्यपूर्ण दिसते. काळ्या टॉवरचे हे आर्किटेक्चर जगभर प्रसिद्ध आहे.
प्रत्येक इमारतीत 23 फ्लॅट असून प्रत्येक फ्लॅटचा आकार 6.100 स्क्वेअर फूट इतका आहे.