दोन्ही सभागृहात अल्पमतात, आता ट्रम्प यांचे पद जाणार का? असा आहे नियम

Rajanand More

मध्यावधी निवडणूक

अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत प्रतिनिधीगृह (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) आणि सिनेट या दोन्ही सभागृहांत डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष अल्पमतात आहे.

US midterm elections 2026 | Sarkarnama

महाभियोगाची चर्चा

आता ट्रम्प यांनाही पदावरून हटविण्यासाठी डेमोक्रेटिक पक्षाकडून महाभियोग प्रक्रिया राबविली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. पण दोन्ही सभागृहात अल्पमतात असूनही ट्रम्प पदावर कायम राहू शकतात.

donald trump | sarkarnama

कशी असते प्रक्रिया?

महाभियोग प्रक्रियेत संसदेची दोन्ही सभागृहे न्यायालयाप्रमाणे भूमिका बजावतात. सर्वप्रथम कनिष्ठ सभागृह म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज राष्ट्राध्यक्षांवर आरोप निश्चित करते. त्यानंतर वरिष्ठ सभागृह म्हणजेच सिनेटमध्ये त्या आरोपांवर खटला चालवला जातो.

Donald trump | Sarkarnama

कोणते आरोप?

महाभियोगासाठी राष्ट्राध्यक्षांवर देशद्रोह, लाचखोरी किंवा ‘हाय क्राइम्स अँड मिसडिमीनर्स’ या स्वरूपाचे गंभीर आरोप ठेवता येतात. यामध्ये सत्तेचा गंभीर गैरवापर, जनतेच्या विश्वासाचा भंग किंवा घटनात्मक कर्तव्यांकडे गंभीर दुर्लक्ष अशा बाबींचा समावेश होऊ शकतो.

Donald trump | Sarkarnama

सुरूवात कशी?

महाभियोगाच्या प्रक्रियेत सर्वप्रथम हाऊसकडून चौकशी केली जाते. यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातात आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्यानंतर आरोपपत्र बहुमताने मंजूर झाल्यास राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग चालवला गेला असे मानले जाते.

Donald Trump | Sarkarnama

किती मतांची आवश्यकता?

प्रतिनिधीगृहात एकूण ४३५ सदस्य असतात. महाभियोगाचे आरोप मंजूर करण्यासाठी साध्या बहुमताची म्हणजेच किमान २१८ सदस्यांचे समर्थन आवश्यक असते. डेमोक्रॅटिककडे २१८ पेक्षा अधिक सदस्यांचे समर्थन असल्यास महाभियोगाचे आरोप मंजूर होऊ शकतात.

Donald Trump | Sarkarnama

सिनेटला महत्व

हाऊसमध्ये महाभियोगाचे आरोप मंजूर होणे म्हणजे याचा अर्थ ट्रम्प यांच्याविरोधात औपचारिक आरोप निश्चित झाले, एवढाच होतो. राष्ट्राध्यक्षांना प्रत्यक्ष पदावरून हटवण्यासाठी सिनेटमध्ये पुढील न्यायालयीन प्रक्रिया पार पडणे आवश्यक असते.

Donald Trump | Sarkarnama

६७ मतांची आवश्यकता

सिनेटमध्ये खटल्याच्या अध्यक्षस्थानी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात. राष्ट्राध्यक्षांना दोषी ठरवून पदावरून हटवण्यासाठी सिनेटच्या दोन-तृतीयांश सदस्यांचे समर्थन आवश्यक असते.

US Voting | Sarkarnama

ट्रम्प यांचा वरचष्मा

सिनेटमध्ये डेमोक्रॅटिकच्या बाजूने ५४ सदस्यांचे समर्थन आहे. मात्र, राष्ट्राध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी आवश्यक असलेला ६७ मते नाहीत. त्यामुळे सिनेटमध्ये मोठे आव्हान असेल. ट्रम्प यांना यापूर्वीही दोनदा या प्रक्रियेला सामोरे जावे लागले असून त्यांची सिनेटमध्ये निर्दोष मुक्तता झाली होती.

Donald Trump Marraige | Sarkarnama

NEXT : मतपत्रिकांवर मतदान, अमेरिकेत इतक्या कमी वेळेत कशी होते मोजणी? जाणून घ्या...

येथे क्लिक करा.