Pradeep Pendhare
इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेत लाखो नागरिक रस्त्यावर उतरून आक्रोश करत आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लाखो लोकांची गर्दी पाहून डोनाल्ड ट्रम्प चकित झाले आहेत.
अयातुल्लाह अली खामेनेई यांचा, लोक द्वेष करत असतील, हे त्यांचे खोटे अश्रूही असू शकतात, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या वेळी, अंत्यसंस्कारादरम्यान इराणच्या उर्वरित नेत्यांनाही आपण एका झटक्यात ठार करू, अशी धमकी दिली.
पण वाटाघाटीसाठी कुणीही शिल्लक राहणार नसल्याने, इराण करारासाठी याचना करत आहे, असे ही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
अली खामेनेई यांचा अत्यंसंस्काराची चार जुलैपासून तयारी, यानिमित्ताने सात जुलैला कोम शहरात धार्मिक कार्यक्रम, तर नऊ जुलैला मशहद येथे दफनविधी केला जाणार आहे.
दोन्ही पक्षांनी या अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर वाटाघाटींमधून एक आठवड्याचा विराम घेतला आहे. या काळात कुणीही एकमेकांवर हल्ला करणार नसल्याचे ठरले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव अली खामेनेई यांचे पुत्र मुज्तबा खामेनेई हे आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या विधींमध्ये सहभागी होणार नाहीत.
इस्रायलच्या धमक्या आणि पाळत ठेवण्याच्या शक्यतेमुळे मुज्तबा खामेनेई यांनी जाहीरपणे उपस्थित राहणे धोक्याचे असल्याचेही म्हटलं आहे.