Rashmi Mane
अमेरिकेचा मोठा निर्णय 1 ऑगस्टपासून भारतातून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर 25% टॅरिफ कर लागू होणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली असून, भारत व्यापारात अडथळा निर्माण करतो आणि जगातील सर्वाधिक आयात शुल्क लादणारा देश आहे, असे त्यांनी यामागे कारण दिले आहे.
या निर्णयाचा भारतातील अनेक महत्त्वाच्या उद्योगांवर मोठा परिणाम होणार आहे. खाली या निर्णयाचा प्रभाव कोणत्या क्षेत्रांवर होईल, याचा आढावा घेऊया.
भारताची टेक्स्टाईल इंडस्ट्री ही जागतिक स्तरावर मोठी आहे. अमेरिका भारताकडून मोठ्या प्रमाणावर कपडे आणि पादत्राणे खरेदी करते. टॅरिफ लागू झाल्यावर ही उत्पादने अमेरिकन बाजारात महाग होतील, त्यामुळे कंपन्यांच्या निर्यातीवर परिणाम होईल.
भारत हा जगातील सर्वात मोठा हिरा निर्यात करणारा देश आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात दागिन्यांची आणि हिऱ्यांची निर्यात होते. टॅरिफ लागू झाल्यास हिरे आणि दागिने महाग होणार असून, यामुळे विक्रीवर परिणाम होईल.
भारत अमेरिकेला अनेक प्रकारच्या ऑटो पार्ट्स आणि वाहने निर्यात करतो. टॅरिफनंतर या वस्तूंच्या किंमती वाढतील, त्यामुळे मागणी कमी होण्याची शक्यता आहे.
भारत दरवर्षी 14 अब्ज डॉलर्सच्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू अमेरिकेला निर्यात करतो. टॅरिफ लागू झाल्यानंतर या वस्तू अमेरिकेत महाग होणार असून, निर्यातीला फटका बसेल.
अमेरिकेच्या या निर्णयाचा प्रभाव औषधे, तेल, वायू, कोळसा, तांबे अशा ऊर्जाविषयक व औद्योगिक उत्पादनांवरही होणार आहे. या क्षेत्रांतील मागणी कमी होऊ शकते आणि त्यामुळे भारताच्या एकूण निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.