Jagdish Patil
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण संघर्ष संपवण्यासाठी पाकिस्तानला अब्राहम करारामध्ये सामील होण्याचं आवाहन केलं आहे.
अमेरिका-इराणमध्ये शांतता करार करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
या करारात पाकिस्तानसह सौदी अरेबिया, कतार, तुर्की आणि जॉर्डनचा सहभाग अनिवार्य असायला हवं, असंही त्यांनी म्हटलं.
मात्र, या करारात सामील होण्याचा आणि इस्रायलला अधिकृत मान्यता देण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव पाकिस्तानने फेटाळला आहे.
इस्रायलसोबत राजनैतिक संबंध सुधारण्यासाठीचा हा करार आपल्या मूळ विचारसरणीच्या विरोधात असल्याची भूमिका पाकने घेतली आहे.
तर पाकिस्तानने ट्रम्प यांचा प्रस्ताव ज्या करारामुळे धुडकावला तो अब्राहम करार नेमका काय आहे ते जाणून घेऊया.
अब्राहम कराराची सुरुवात 2020 मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात झाली.
इस्रायल आणि अरब राष्ट्रांमधील राजनैतिक, आर्थिक आणि सुरक्षाविषयक संबंध पूर्ववत करणे हा या कराराचा उद्देश होता.
या करारावर UAE आणि बहरीन यांनी सर्वात आधी सह्या केल्या होत्या. त्यानंतर सुदान आणि हे देशही यात सहभागी झाले.