Pradeep Pendhare
अमेरिकेत सोशल मीडियावर भारतीयांविरुद्ध वर्णद्वेषी पोस्ट गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर, डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर पोस्टमध्ये वाढ दिसली.
अमेरिकेतली बिगरराजकीय 'नाॅन प्राॅफिट ऑफ ऑर्गनाइज्ड हेट' या संस्थेने याबाबत प्रसिद्ध केला अहवाल.
अहवालानुसार वंशवादाची प्रवृत्ती भारतीयांपुरती नसून धर्म, नागरिकत्व किंवा वांशिक ओळख काहीही असो, संपूर्ण दक्षिण आशियाई समुदायाला लक्ष्य करत आहे.
ऑनलाइन द्वेषात जानेवारी 2025मध्ये 88 हजार प्रकार, तर हिंसाचाराच्या धमक्यात माहे 973 ने वाढ झाली आहे.
टेक्सास, पेन्सिल्व्हेनिया, व्हर्जीनिया, कॅलिफोर्निया आणि मिडवेस्ट ही अमेरिकेतली हिंसाचाराची हाॅटस्पाॅट आहेत.
भारतीयांविरुद्ध वाढत्या द्वेषासाठी ट्रम्प धोरण जबाबदार असून, ऑक्टोबर 2025मध्ये एच-1बी व्हिसासाठी अंदाज 8.8 दशलक्ष रुपयांचा नवीन शुल्क आकारले.
फेब्रुवारी 2025 मध्ये 104 भारतीयांना लष्करी विमान सेवेतून हद्दपार करण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प धोरणांमुळे भारतीयांवर वर्णद्वेषी पोस्ट, ऑनलाइन ट्रोलिंग वाढले आहे.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात प्रमुख सल्लागार म्हणून श्रीराम कृष्णन यांच्या नियुक्तीला विरोध यातील प्रमुख कारण आहे.
विवेक रामास्वामी यांच्या पदाबद्दल नाराजी, ज्यामध्ये त्यांनी कुशल स्थलांतरित कामागारांसाठी अधिक व्हिसा देण्याची मागणीचे दुसरे कारण आहे.