Jagdish Patil
टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन यांनी 31 ऑक्टोबरला तेलंगाना सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी उपस्थित होते.
अझहरूद्दीन यांनी 2009 मध्ये काँग्रेस पक्षातून राजकारणाला सुरुवात केली. ते मुरादाबादमधून खासदार म्हणून निवडून आले होते.
अझहरूद्दीन यांच्या आधीही अनेक क्रिकेटपटूंनी मंत्रीपद भूषवलं आहे. त्यांच्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
टीम इंडियाचा माजी सलामीवीर नवजोत सिंह सिध्दूंनी 2017 ची अमृतसर विधानसभा जिंकल्यानंतर ते पंजाब सरकारमध्ये पर्यटन आणि स्थानिक स्वराज्य संस्था मंत्री बनले.
माजी क्रिकेटपटू चेतन चौहान दोनदा भाजप खासदार झाले. त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली पण त्यांचं 16 जुलै 2020 मध्ये त्यांचं निधन झालं.
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू मनोज तिवारींनी ममता बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
टीम इंडियाचे खेळाडू लक्ष्मी रतन शुक्ला यांची बंगाल सरकारमध्ये युवा सेवा आणि क्रीडा राज्यमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली होती.
भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे 2019 मध्ये भाजपच्या तिकीटावर खासदार झाले. तर युसूफ पठाण आणि किर्ती आझाद खेळाडू देखील राजकारणात आहेत.