Pradeep Pendhare
अमेरिकेचा जगभरातील देशांसोबत व्यापर असून, देशांसोबत व्यापारी तूट भरून काढण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा भर आहे.
भारत अन् ब्राझीलवर सर्वाधिक 50 टक्के आयात शुल्क अमेरिकेने लादले आहे. आयात शुल्क वाढवल्याने अमेरिकेत देखील महागाईचा भडका उडाला आहे.
अमेरिकेत ऑगस्टमध्ये कपड्यांच्या किमतीत 0.5, तर किराणा मालाच्या किमतीत 0.6 टक्के वाढ नोंदवली गेली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरित धोरणामुळे महागाईत वाढ झाल्याचे निरीक्षण आहे.
कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दैनंदिन वस्तूंवर जास्त खर्च करावा लागत असल्याने आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
घरगुती उपकरणे, इलेक्ट्राॅनिक्ससह इतर रोजच्या वापरातील वस्तू महाग झाल्या आहे.
अल्प व मध्यम उत्पन्न कुटुंबांच्या उत्पन्नात बदल झाला नसल्याचे अमेरिकेच्या जनगणना विभागाची आकडेवारी दर्शवते.
अल्प व मध्यम उत्पन्न कुटुंबांच्या क्रेडिट कार्डमधील कर्जात वाढ झाल्याची बोस्टन फेडरल रिझर्व्हने निष्कर्ष नोंदवला आहे. कर्ज पातळी कोरोना संकटा वेळी असलेल्या कर्जाच्या पातळीपेक्षा जास्त आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच आयात शुल्कचे धोरण अमेरिकेत महागाई वाढवणारे अन् मध्यम वर्गाचे कंबरडे मोडणार ठरले.