ट्रम्प-पुतिन यांचा जगातील सर्वात सेफ गाडीतून प्रवास 'द बीस्ट' कारचे फिचर्स काय?

Jagdish Patil

ट्रम्प-पुतिन

डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन या दोन नेत्यांमध्ये अलस्काच्या अँकोरेज येथील जॉइंट बेस एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन येथे एक बैठक झाली.

Donald Trump and Vladimir Putin meet in Alaska | Sarkarnama

फोटो आणि व्हिडिओ

या नेत्यांच्या भेटी दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ते 'द बीस्ट' नावाच्या अमेरिकन अध्यक्षांच्या लिमोझिनमधून प्रवास करताना दिसत आहेत.

Donald Trump and Vladimir Putin meet in Alaska | Sarkarnama

'द बीस्ट'

या दोन्ही नेत्यांनी प्रवास केल्यामुळे 'द बीस्ट' कार पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ते जाणून घेऊया.

Donald Trump and Vladimir Putin meet in Alaska, traveling in 'The Beast'

प्रवास

अमेरिकन अध्यक्ष जेव्हा एअर फोर्स वन किंवा मरीन वन हेलिकॉप्टरने प्रवास करत नाहीत, तेव्हा ते 'द बीस्ट'मधून प्रवास करतात.

The Beast Car Features | Sarkarnama

वजन

या कारचं वजन 20 हजार पौंड असून अत्यानुधिक सुरक्षा आणि कम्युनिकेशन प्रणालींनी सुसज्ज आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात 2018 साली राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात सामील झाली.

The Beast Car Features | Sarkarnama

किंमत

तिची किंमत 1.5 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असून ती जगातील सर्वात सुरक्षित कार समजली जाते. अमेरिकेतील जनरल मोटर्स कंपनीने ही बनवलेल्या या कारमध्ये शत्रूचा हल्ला परतवण्यासह प्रतिहल्ला करण्याची क्षमता आहे.

The Beast Car Features | Sarkarnama

बचाव

या कारमधून 7 जण एकत्र प्रवास करू शकतात. गाडीतील लोकांचा बंदुकीच्या गोळ्यांसह ग्रेनेड ब्लास्ट आणि केमिकल अटॅकपासूनही बचाव होऊ शकतो.

The Beast Car Features | Sarkarnama

बुलेटप्रूफ

या कारला बुलेटप्रूफ काचा असून तिचं आर्मर हे अ‍ॅल्युमिनिअम, सिरॅमिक आणि स्टील या मटेरिअलपासून बनवलं. कारचे पुढचे 5 इंच आणि मागचे दरवाजे 8 इंच जाड आहेत.

The Beast Car Features | Sarkarnama

सुविधा

कारमध्ये एक टिअर गॅस डिस्पेन्सर, स्मोक स्क्रीन, नाईट व्हिजन कॅमेरा, शॉटगन, ऑक्सिजन सिलिंडर, सॅटेलाईट फोन ठेवला जातो.

The Beast Car Features | Sarkarnama

परदेश दौरा

महत्वाची बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा ही कार सोबत घेऊनच जातात.

The Beast Car Features | Sarkarnama

NEXT : व्लादिमिर पुतीन यांचे सिक्रेट लग्न? दोन मुलंही; 'या' सुंदर खेळाडूशी जोडले नाव

Alina Kabaeva Vladimir Putin | sarkarnama
क्लिक करा