Roshan More
पुतीन हे आपले खासगी आयुष्य अतिशय गुप्त ठेवतात. मात्र, त्यांचे नाव वारंवार माजी ऑलिंपिक खेळाडू जिम्नॅस्ट अलीना कबाएवा यांच्याशी जोडले जाते.
माजी ऑलिंपिक जिम्नॅस्ट अलीना कबाएवा यांचं नाव रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत वारंवार जोडलं जातं. अलीना कबाएवा या पुतीन यांच्या सिक्रेट गर्लफ्रेंड असल्याची चर्चा आहे.
मिडिया रिपोर्टनुसार अलीना कबाएवा आणि पुतीन यांना दोन मुलं देखील आहेत. जे आई अलीनासोबत गुप्त गुप्त जीवन जगत आहेत.
2013 पासून आजतागायत पुतिन यांनी दुसरं लग्न केलेलं नाही. मात्र, अलीनासोबत त्यांचे नाव कायम जोडले जाते.
मीडिया रिपोर्टनुसार पुतिन आणि कबाएवा यांनी 2008 मध्ये एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं.
अलीना या ऑलिंपिकमध्ये जिम्नॅस्टिक्समध्ये सुवर्ण पदक विजेत्या खेळाडू आहेत. त्या खासदारदेखील राहिल्या आहेत.
पुतीन यांचे ल्युडमिल यांच्यासोबत लग्न झाले होते. मात्र, 2013 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुली देखील आहेत