Ganesh Sonawane
दुहेरी जन्मठेप म्हणजे एखाद्या दोषी व्यक्तीला दोन स्वतंत्र गुन्ह्यांसाठी दोन वेगवेगळ्या जन्मठेपेच्या शिक्षा सुनावल्या जाणे.
यामध्ये काही गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या व्यक्तीचा तुरुंगातच मृत्यू होतो.
काही न्यायालयांमध्ये, दुहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पॅरोलसाठीही पात्र नसतो.
जेव्हा न्यायालय (Court) एकापेक्षा जास्त गुन्ह्यांच्या प्रकरणात प्रत्येक गुन्ह्यासाठी गुन्हेगाराला वेगळी शिक्षा देते तेव्हा ती दुहेरी शिक्षेच्या श्रेणीत येते.
गुन्हे गंभीर असल्यास, दोषीला एकापेक्षा जास्त वेळा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
एकल जन्मठेपेत गुन्हेगार काही कालावधीनंतर तुरुंगातून बाहेर येतो, परंतु दुहेरी जन्मठेपेत, गुन्हेगाराने एक शिक्षा पूर्ण केल्यावरच दुसरी शिक्षा सुरु होते.
धुळे येथे बाप-लेकाच्या खून प्रकरणात माजी नगराध्यक्षासह ११ आरोपींना न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दुहेरी २८ वर्षांची ही शिक्षा सुनावताना, हा खटला सुरु असताना आरोपींनी आठ वर्षांची शिक्षा भोगल्यामुळे उर्वरित २० वर्ष त्यांचा मुक्काम जेलमध्ये राहणार आहे.
या शिक्षा एकाच वेळी (concurrent) भोगायच्या असू शकतात किंवा एकामागोमाग एक (consecutive) भोगायच्या असू शकतात.