Ganesh Sonawane
नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील यूथ फेस्टिव्हल मैदानावर पाच दिवसांचा (१२ मार्च ते १६ मार्च) ‘कृषी कुंभ 2026’ महोत्सवाची सुरुवात
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे शेतकऱ्यांना आवाहन
“शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरा, उत्पन्न वाढवा.”
400 हून अधिक कृषी स्टॉलचे प्रदर्शन
कृषी विभागासह 16 विभागांचे आधुनिक तंत्रज्ञानाचे स्टॉल.
ड्रोन आणि स्मार्ट सेन्सरचे प्रात्यक्षिक
शेतीसाठी AI, स्मार्ट सेन्स आणि उपकरणांची माहिती.
देशभरातील प्रगतिशील शेतकरी सहभागी
काश्मीर ते केरळपर्यंतचे तज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार.
द्राक्ष, डाळिंब आणि कांदा शेतीवर विशेष सत्र
चार दिवस विविध पिकांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
कृषी कुंभात सांस्कृतिक कार्यक्रमही
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ आणि ‘फोकलोक’चे आयोजन.
खाऊ गल्ली आणि पारंपरिक खाद्यपदार्थ
मिसळ, पुरणपोळी, धपाटे, थालीपीठची मेजवानी.