Rashmi Mane
सरकारची नवी सुविधा काही सेकंदात डिजिटल आधार थेट तुमच्या मोबाईलवर.
आधार कार्ड आज प्रत्येक भारतीयासाठी अत्यावश्यक ओळखपत्र बनलं आहे.
बँक खाते, सिम कार्ड, सरकारी योजना सगळीकडे त्याची गरज पडते.
UIDAI ने सुरू केलीये नवी सेवा आता थेट WhatsApp वरून डाउनलोड करा तुमचा आधार कार्ड! सुरक्षित, सोपी आणि वेळ वाचवणारी सुविधा.
ही सेवा सरकारच्या MyGov Helpdesk या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीने वापरकर्ते पासवर्ड-प्रोटेक्टेड डिजिटल आधार PDF डाउनलोड करू शकतात.
ही सेवा वापरण्यासाठी आवश्यक आहे. आधारशी मोबाइल नंबर लिंक करणे गरजेचे. तसेच DigiLocker खाते सक्रिय असणे आवश्यक हा सेव्ह करणे गरजेचे.
WhatsApp मध्ये ‘MyGov Helpdesk’ सेव करा. “Hi” असा मेसेज पाठवा.
“DigiLocker Services” निवडा आणि आधार नंबर टाका आणि आलेल्या OTP ने पडताळणी करा.
पडताळणी पूर्ण झाल्यावर चॅटबॉट दाखवेल तुमच्या DigiLocker दस्तऐवजांची यादी.
त्यातून Aadhaar Card निवडा आणि काही सेकंदात PDF स्वरूपात मिळवा!
एकावेळी फक्त एकच दस्तऐवज डाउनलोड करता येतो. आधार आधी DigiLocker मध्ये लिंक असणं आवश्यक आहे. लिंक नसेल तर DigiLocker अॅपवर जाऊन अपडेट करा.