Rashmi Mane
डिजिटल पेमेंटच्या जगात भारत आता आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे.
म्यूज वियरेबल्स (Muse Wearables) या भारतीय टेक कंपनीने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत हातमिळवणी करून देशातील पहिले वियरेबल पेमेंट इकोसिस्टम तयार केले आहे.
यामुळे आता फोन, कार्ड किंवा वॉलेट न वापरता फक्त एक स्मार्ट रिंग टॅप करून पेमेंट करणे शक्य होणार आहे.
ही तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट रिंग म्हणजेच Muse Ring One, रुपे नेटवर्क आणि म्यूज वॉलेटच्या सहाय्याने कार्य करते.
वापरकर्त्याला फक्त आपला रुपे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड म्यूज अॅपमध्ये ऍड करायचा आहे. त्यानंतर तो कार्ड ‘टोकन’मध्ये रूपांतरित होऊन रिंगमध्ये असलेल्या सिक्योर एलिमेंट चिपमध्ये साठवला जातो.
हीच ती सुरक्षा तंत्रज्ञान आहे जी पासपोर्ट आणि बँक कार्डमध्ये वापरली जाते. त्यामुळे कार्डची खरी माहिती कधीच बाहेर येत नाही आणि व्यवहार पूर्णपणे सुरक्षित राहतो.
रिंग हातात घालून कोणत्याही NFC पॉस टर्मिनलवर टॅप केल्यावर व्यवहार काही सेकंदात पूर्ण होतो. रिंग हातातून काढताच ती आपोआप निष्क्रिय होते. त्यामुळे चोरी किंवा हरवण्याचा धोका जवळजवळ नाहीसा होतो.