Rajanand More
कर्नाटकातील आयपीएस अधिकारी वर्तिका कटियार पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी रुपा डी मौदगिल यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
कटियार यांची नियुक्ती इंटरनल सिक्युरिटी डिव्हीजन (ISD) मध्ये होती. IPS रुपा या विभागाच्या आयजी आहेत. तर वर्तिका या डीआयजी होत्या.
रुपा यांनी गोपनीय कागदपत्रे माझ्या संमतीशिवाय माझ्या कार्यालयात ठेवली. माझ्याविरोधात षडयंत्र रचत होत्या, अशी तक्रार वर्तिका यांनी मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांकडे केली होती.
तक्रारीनंतर वर्तिका यांची 24 तासांच्या आत बदली करण्यात आली. त्यांना आता नागरिक सुरक्षा विभागात पाठवण्यात आले आहे.
वर्तिका या 2010 च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. धारवाडच्या पोलिस अधिकक्षक अशा विविध महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
2015 मध्ये टिपू सुलतान जयंती कार्यक्रमामध्ये मदिकेरी येते मोठी हिंसा झाली होती. दंगलीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
तत्कालीन काँग्रेस सरकारने वर्तिका यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. म्हैसूरच्या तत्कालीन उपायुक्त सी. शिखा यांच्या चौकशीत त्यांना निर्दोष ठरवण्यात आले होते.
मार्च 2021 मध्ये कटियार यांनी आयएफएस अधिकारी असलेल्या पतीवर हुंडा मागितल्याचा आरोप केला होता. त्यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिली होती.