सरकारनामा ब्यूरो
उत्तर प्रदेशचे सतत चर्चेत राहणारे हिमांशू कुमार यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
2010 बॅचचे IPS अधिकारी असलेले हिमांशू कुमार यांची इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये DIG पदावर या नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत केद्र सरकारचे अपर सचिव संजीव कुमार यांना पत्र पाठवण्यात आले असून त्यांची या पदावर नियुक्ती 5 वर्षांसाठी असणार आहे.
गेल्या महिन्यापूर्वी त्यांना उत्तर प्रदेशातून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर जाण्यासाठी 'एनओसी' मिळाली होती.
हिमांशू कुमार हे बिहारच्या मोतिहारी जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव मनोज कुमार आहे.
चर्चेत असणारे हिमांशु कुमार यांनी पत्रकारितेमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. त्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी करत परीक्षा उत्तीर्ण केली.
फिरोजाबाद येथे ते एसपी म्हणून तैनात होते. तर 2017 च्या निवडणूक आयोगाने त्यांची बदली लखनऊ येथील डीजीपी मुख्यालयात केली होती.
योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर समाजवादी पक्षाच्या सरकारवर जाती आणि धर्माच्या आधारावर अधिकाऱ्यांना पदे आणि भूमिका वाटल्याचा आरोप हिमांशू कुमार यांनी केला होता. यानंतर ते खूप चर्चेत आले होते.