Dr. Aniket Deshmukh डॉ. अनिकेत देशमुखांचे बंड 24 तासांत झाले थंड...

Vijaykumar Dudhale

गणपतराव देशमुख यांचे नातू

डॉ. अनिकेत देशमुख हे सांगोल्याचे माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू होत. ते उच्चविद्याविभूषित आहेत.

Ganpatrao Deshmukh-Dr. Aniket Deshmukh | Sarkarnama

शरद पवार यांची भेट

शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व डॉ. अनिकेत देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. माढा लोकसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी पवारांकडे केली होती.

Sharad Pawar-Dr. Aniket Deshmukh | Sarkarnama

शहाजी पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले

सांगोला मतदारसंघातून डॉ. अनिकेत देशमुख यांनी 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात लढवली होती.

Dr. Aniket Deshmukh | Sarkarnama

डॉ. अनिकेत देशमुख यांचा अवघ्या 764 मतांनी पराभव

विधानसभेच्या मागील निवडणुकीत डॉ. अनिकेत देशमुख यांचा अवघ्या 764 मतांनी शहाजी पाटील यांच्या विरोधात पराभव झाला होता.

Dr.Babasaheb & Aniket Deshmukh | Sarkarnama

डॉ. अनिकेत यांच्यासाठी माढ्याची मागणी

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाची मागणी पवारांकडे केली होती.

Dr.Babasaheb & Aniket Deshmukh | Sarkarnama

‘शिवरत्न’वरील बैठकीला उपस्थिती

माढा लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी ठरविण्यासाठी मोहिते पाटील यांनी ‘शिवरत्न’वर बोलावलेल्या बैठकीला डॉ. अनिकेत देशमुख उपस्थित होते.

Dr. Aniket Deshmukh | Sarkarnama

माढ्यातून लोकसभा लढविण्याची घोषणा

महाविकास आघाडीकडून आम्हाला गृहीत धरण्यात येत आहे. आमच्यावर अन्याय होत आहे, असे सांगून डॉ. अनिकेत देशमुख यांनी माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.

Dr. Babasaheb Deshmukh-Dr. Aniket Deshmukh | Sarkarnama

पवारांच्या भेटीनंतर निवडणूक लढविण्याची घोषणा मागे

शरद पवार यांच्या भेटीनंतर अवघ्या 24 तासांच्या आतमध्ये डॉ. अनिकेत देशमुख यांचे बंड शांत झाले. डॉ. अनिकेत यांच्यासोबत धैर्यशील मोहिते पाटील हेही पवारांना भेटायला बारामतीला गेले होते. त्या भेटीनंतर त्यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा मागे घेतली.

R

Dr. Aniket Deshmukh | Sarkarnama

काँग्रेस माजी मंत्र्यांच्या पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश; सुनील चव्हाणांमुळे महायुतीची ताकद वाढणार?

Sunil Chavan | Sarkarnama