Roshan More
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना जागतिक दर्जाचे विद्यापीठ महाराष्ट्रात उभारायचे होते.
बाबासाहेबांनी विद्यापीठ उभारण्यासाठी पुण्याजवळील तळेगावची निवड केली होती.
बाबासाहेबांनी खरेदी केलेली जागेवर अन्य व्यवसाय करण्याचा प्रकल्प त्यांचाकडे आले होते मात्र आपण येथे शैक्षणिक संकुलच उभारणार जागेचा वापर अन्य कारणासाठी करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक दर्जाचे विद्यापीठ उभारण्याची बाबासाहेबांनी तब्बल 87 एकर जागेची खरेदी केली होती.
बाबासाहेबांनी खरेदी केलेल्या जागेमध्ये 1947 ला बंगला बांधला तो आजही आहे. स्मारक म्हणून त्याचे जतन करण्यात आले आहे.
अनेक व्यापाऱ्यांनी बाबासाहेबांना उभारायच्या असलेल्या विद्यापीठासाठी मदत देऊ केली. मात्र, धनिक लोकांकडून पैसे घेऊन शिक्षण संस्थांना त्यांचे नाव देण्यास बाबासाहेबांचा विरोध होता.
बाबासाहेबांनी विद्यापीठ उभारण्याचे प्रयत्न केले तेव्हाच त्यांच्यावर देशाच्या कायदेमंत्रिपदाची जबाबदारी, धर्मांतरांच्या चळवळी सुरू झाली. पुढे त्यांची प्रकृतीदेखील खालवली. त्यामुळे बाबासाहेबांना विद्यापीठ उभारण्याचा संकल्प पूर्ण करता आली नाही.
बाबासाहेबांचे विद्यापीठ उभारण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, आज देशात त्यांच्या नावाने तब्बल 16 विद्यापीठे आहेत. ज्यामध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.