सरकारनामा ब्यूरो
गौतम बुद्ध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले सर्वश्रेष्ठ गुरू होते.
पण बाबासाहेब आंबेडकर यांना गौतम बुद्धांची पहिली ओळख कशी झाली तुम्हाला माहिती आहे का?
'माझी आत्मकथा' या पुस्तकात आंबेडकरांनी या गोष्टीबद्दल उल्लेख केला आहे.
दादा केळुसकर यांनी बुद्धाचे चरित्र लिहिले होते. ते त्यांनी बाबासाहेबांना मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या कौतुक सभारंभात भेट म्हणून दिले होते.
बुद्धाचे चरित्र या पुस्तकांमुळे बाबासाहेबांचे आयुष्यच बदलले. बाबासाहेब म्हणतात, ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला.
उच्च-नीचतेला त्या धर्मात स्थान नाही. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी या ग्रंथांवरचा माझा विश्वास उडाला, असे बाबासाहेब म्हणाले.
मी बौद्ध धर्माचा उपासक बनलो. जगामध्ये बौद्ध धर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगावयाचे असेल तर त्या धर्माचा भारताने स्वीकार करावा असे आंबेडकरांना वाट होते.
कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी आध्यात्मिक ज्ञानरत्नावली, गौतम बुद्ध यांचे चरित्र, तुकाराम महाराजांचे चरित्र, छत्रपती शिवाजी महाराज अशी साहित्य निर्मिती केली.