सरकारनामा ब्यूरो
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरातून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले जात आहे.
परदेशात शिक्षण घेऊन आल्यानंतर बाबासाहेबांनी देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
राष्ट्र उभारणीसाठी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा परिघामध्ये क्षेत्रांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
देशात सगळ्यांना मंदिर प्रवेश, अस्पृश्यता निवारण, जातीवाद निर्मूलन आणि सामाजिक रुढींचे निर्मूलन करण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक प्रकारची आंदोलने केली.
जातीवाद नष्ट होऊन सगळ्यांना समान शिक्षणाचा न्याय मिळावा, यासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुंबई आणि औरंगाबाद येथे महाविद्यालयांची स्थापना केली.
बाबासाहेब आंबेडकरांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या प्रबंधाच्या आधारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली.
देशातील सर्व शेतीचे राष्ट्रीयीकरण होऊन त्यासाठी वेगळे अधिनियम आणि कायदे असावे याची संकल्पना त्यांनी देशासमोर मांडली.
बाबासाहेब यांच्या संशोधनावर आधारित 'भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण' या तत्वावर वित्त आयोगाची स्थापना केली.
संविधानाद्वारे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित समाजरचना घडवली. तसेच देशाच्या विकासासाठी त्यांनी मजबूत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि परराष्ट्र अशी अनेक धोरणे आखली.