सरकारनामा ब्यूरो
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचे आणि अस्पृश्यांचे प्रश्नच सोडविले नाहीत तर अनेक स्त्रिया,शिक्षण, मजुरांचे प्रश्न, जागतिक शांतता, ढासळत चाललेली नैतिक मूल्ये, पाणीवाटप, धरणांचे, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय दिला.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबरोबर बाबासाहेबांनीही शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न सोडवले आहेत.
डॉ. आंबेडकरांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत सामान्य शेतकरी आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी त्यांनी 1936 ला ‘स्वतंत्र मजूर पक्षा’ची स्थापना केली.
जमीनदारांच्या छळाविरुद्ध, पिळवणुकीविरुद्ध आवाज उठवत त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या हिताची अनेक धोरणे आखली होती.
शेतीविषयक अनेक गुंतवणुकीच्या समस्याचा अभ्यास करून त्यांनी त्यावर काम केले. तसेच अस्पृश्यांना जमिनी मालकीने देण्यात याव्यात अशी त्यांनी सूचनाही बाबासाहेबांनी केली होती.
घटना निर्मितीच्या वेळी शेती विषयावर व शेतकऱ्यांच्या कल्याणाविषयी भारताचे कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अनेक योजना मांडायचे आणि आंबेडकर त्यांना मंजूर करायचे.
डॉ. बाबासाहेबांनी दिल्लीमधील त्यांच्या शासकीय निवासस्थानावर गव्हाचे पीक घेतले होते तसेच अनेक पालेभाज्याही लावल्या होत्या.
औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात ते मुक्काम होते, त्यावेळी त्यांना अनेक मंडळी भेटण्यास येत. त्यांनी त्यांना अट घातली, मला भेटावयाचे असेल, त्यांनी किमान एक झाड विद्यालयाच्या परिसरात लावायचे.
भारतीय कृषी अनुसंधान संस्था, पुसा इन्स्टिट्यूट यांच्याबद्दल त्यांना अपार आपुलकी असल्याने त्यांनी ‘अधिक धान्य पिकवा’ ही त्यांची मोहीम होती.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी केलेल्या मूलभूत हरितक्रांती, जमीन सुधारणाविषयक कायदे करत शेतीक्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गुणात्मक बदल केले आहेत.