Phule And Ambedkar : जोतिबा अन् आंबेडकर, एकमेकांना न भेटलेले गुरू-शिष्य; पराकोटीची वैचारिक समानता, जाणून घ्या...

Pradeep Pendhare

पहिला तत्वचिंतक

शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या गुलामगिरीविरुद्ध चळवळ उभा करणारा पहिला तत्त्वचिंतक, म्हणजे महात्मा जोतिबा फुले!

Phule And Ambedkar | Sarkarnama

बुद्ध, कबीर अन् जोतिबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जोतिबांना बुद्ध अन् कबीर यांच्या पंक्तीत आपले गुरू बनवले. ते दोघे एकमेकांना कधीच भेटले नाही.

Phule And Ambedkar | ेोीकोीलोसो

वैचारिकता समानता

जोतिबा फुले 1890 साली निर्वाण पावले, तर 1891 झाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. तरी एकमेकांना कधीच न भेटलेल्या गुरू-शिष्यात पराकोटीची वैचारिक समानता होती.

Phule And Ambedkar | Sarkarnama

संघर्षाची पूर्वपिटिका

डॉ. आंबेडकरांनी सार्वजनिक पाणवठ्यावर नागरी अधिकार प्रस्थापित करण्यासाठी 1920च्या दशकात महाडचा रणसंग्राम सुरू केला, त्याची पूर्वपिटिका जोतिबा फुले यांनीच होती.

Phule And Ambedkar | Sarkarnama

महार-मांगासाठी पाणी

जोतिबांनी 1868 साली सनातन्यांच्या शिव्य- शापाला न भिता आपल्या घराजवळील पाण्याचा हौद महार मांगासाठी खुला केला.

Phule And Ambedkar | Sarkarnama

महाडचा सत्याग्रह

जोतिबा फुले यांनी मनुस्मृती ही शूद्राच्या बोकांडी गुलामगिरी बसवते म्हणून, तिला अपवित्र ठरवत तिचा धिक्कार केला. तीच मनुस्मृती डॉ. आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहात जाळली.

Phule And Ambedkar | Sarkarnama

जोतिबांशी एकनिष्ठ

"जोतिबांचा अनुयायी म्हणून घेण्यात मला यापूर्वी कधीच लाज वाटली नाही. मीच तेवढा खरा जोतिबांना एकनिष्ठ राहिलो आहे," असे डॉ. आंबेडकर म्हणायचे.

Phule And Ambedkar | Sarkarnama

धर्मचिकित्सासाठी संघर्ष

जोतिबांच्या धर्मचिकित्सा, शूद्र अतिशूद्र आणि स्त्रियांची उन्नती आणि त्यांचे नागरी अधिकार व लोकशाहीच्या व्यापक विस्तारासाठी डॉ. आंबेडकर संघर्ष करत राहिले.

Phule And Ambedkar | Sarkarnama

आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी

आचार्य अत्रे यांनी 'महात्मा फुले' चित्रपट बनवला, तेव्हा हा चित्रपट पाहताना फुल्यांचे कार्य अन् त्याग आठवून आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी आले होते.

Phule And Ambedkar | Sarkarnama

NEXT : अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसूल होणार?

येथे क्लिक करा :