सरकारनामा ब्यूरो
डाॅ. बाबसाहेब आंबेडकर यांनी 'माझी आत्मकथा' या पुस्तकात त्यांच्या तीन गुरूंविषयी उल्लेख केला आहे.
डाॅ. बाबसाहेब आंबेडकर हे त्यांच्या जीवनात अमूलाग्र क्रांती घडवून आणण्याचे श्रेय या 3 गुरुंना देतात.
बाबासाहेब म्हणतात की, 'माझे पहिले सर्वश्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध आहेत. शिवचरित्रकार दादा केळुसकर यांनी मला एक पुस्तक भेट म्हणून दिले होते'. या पुस्तकात बुद्धाचे चरित्र लिहिले होते.
पुस्तक वाचल्यानंतर मला अनेक चांगले अनुभव आले. हे पुस्तक वाचल्यानंतर, मी बौद्ध धर्माचा उपासक बनलो. जगामध्ये बौद्ध धर्मासारखा धर्म नाही. असं बाबासाहेब म्हणाले.
डाॅ.बाबासाहेबांचे दुसरे गुरु संत कबीर होते. ते लिहितात की, ' इथे भेदभाव होत नव्हता. गांधींना मी नुसते गांधी न म्हणता ‘महात्मा गांधी’ म्हणावे, अशी मला कबीरांची आग्रहाची पत्रे आली होती.
कबीर म्हणजे धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर लेखनीच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरू मानले.
बाबासाहेब म्हणतात की, 'माझे तिसरे गुरु म्हणजे महात्मा जोतिबा फुले आहेत. ज्यांनी मला शिंपी, कुंभार, न्हावी,कोळी, महार, मांग, चाभारांना माणुसकीचे धडे देण्याची शिकवण दिली.
आधुनिक भारतीय इतिहासात शूद्र-अतिशूद्र, महिला आणि शेतकरी यांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जे लढले ते महात्मा जोतिबा फुले होते. म्हणूनचं त्यांना गुरु मानत बाबासाहेबांनी समाजात अनेक परिवर्तन घडवून आणले.