Dr. Babasaheb Ambedkar: आंबेडकरांचा ‘तो’ ऐतिहासिक निर्णय! बौद्ध धर्मच का निवडला? जाणून घ्या!

Mangesh Mahale

कारण काय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यामागील खरे कारण काय होते? त्यांच्या विचारांचा आणि ऐतिहासिक निर्णयाचा सविस्तर आढावा येथे वाचा.

Why Babasaheb Ambedkar Chose Buddhism | Sarkarnama

नागपूर

नागपूर येथे १४ ऑक्टोबर म्हणजे विजयादशमीच्या दिवशी सकाळी ९ ते ११च्या दरम्यान आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याचं घोषित केलेलं होतं.

Why Babasaheb Ambedkar Chose Buddhism | Sarkarnama

हिंदू म्हणून...

'मी अस्पृश्य जातीत जन्मास आलो. हा काही माझा अपराध नाही; परंतु मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाहीं' असं ते म्हणाले होते.

Why Babasaheb Ambedkar Chose Buddhism | Sarkarnama

बीबीसी

1956च्या मे महिन्यात 'बीबीसी'वरून केलेल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धर्म का आवडतो, याबाबत सविस्तर भाष्य केले होते.

Why Babasaheb Ambedkar Chose Buddhism | Sarkarnama

तीन तत्त्व

"मला बौद्ध धर्म आवडतो, कारण कुठल्याही धर्मात जी तीन तत्त्व सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वं शिकवतो.

Why Babasaheb Ambedkar Chose Buddhism | Sarkarnama

पुनरुज्जीवन

मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला त्यांची आवश्यकता आहे. एकदा बौद्ध धर्म सामाजिक तत्त्व आहे, असं मान्य झालं म्हणजे त्याचं पुनरुज्जीवन ही एक चिरकालीन घटना होईल,"

Why Babasaheb Ambedkar Chose Buddhism | Sarkarnama

हित

बौद्ध धर्म स्वीकारून मी या देशाचं जास्तीत जास्त हित साधत आहे, कारण बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे.

Why Babasaheb Ambedkar Chose Buddhism | Sarkarnama

धर्मतत्त्वे

देशाची संस्कृती, इतिहास यांच्या परंपरेला धक्का लागणार नाही, अशी मी खबरदारी घेतली आहे... भगवान बुद्धाने जी धर्मतत्त्वे उपदेशिली आहेत तीच मी पाळणार आहे.

Why Babasaheb Ambedkar Chose Buddhism | Sarkarnama

नवायान

हीनयान आणि महायान या बौद्ध धर्मातील पंथांमुळे जे मतभेद झाले आहेत त्यांपासून मी माझ्या लोकांना अलिप्त ठेवणार आहे. आपला बौद्ध धर्म म्हणजे एक प्रकारचा नवबौद्ध धर्म किंवा नवायान आहे," असे आंबेडकर म्हणाले होते.

Why Babasaheb Ambedkar Chose Buddhism | Sarkarnama

NEXT: MPSC: एक परीक्षा, अनेक नोकऱ्या! सरकारचा मोठा निर्णय ‘निपुण सेतू’ योजना काय आहे?

येथे क्लिक करा