MPSC: एक परीक्षा, अनेक नोकऱ्या! सरकारचा मोठा निर्णय ‘निपुण सेतू’ योजना काय आहे?

Mangesh Mahale

मंत्रीमंडळाचा निर्णय

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

MPSC ‘Nipun Setu’ Scheme | Sarkarnama

'निपुण सेतू'

यूपीएससीच्या 'प्रतिभा सेतू'च्या धर्तीवर आता एमपीएससीसाठी 'निपुण सेतू' योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

MPSC ‘Nipun Setu’ Scheme | Sarkarnama

वेळ, पैसा वाचणार

या निर्णयामुळे परीक्षार्थिंचा वेळ, पैसा वाचणार असून भरती प्रक्रियेत सहजता आणि सुसूत्रता येणार आहे.

MPSC ‘Nipun Setu’ Scheme | Sarkarnama

परीक्षा

उमेदवारांना आता एकाच पदासाठी किंवा समांतर पदांसाठी वारंवार परीक्षा द्यावी लागणार नाही.

MPSC ‘Nipun Setu’ Scheme | Sarkarnama

वेटिंग लिस्ट

एकदा परीक्षा दिल्यानंतर मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि तयार करण्यात आलेल्या वेटिंग लिस्टचा वापर करून इतर विभागांतील रिक्त पदे भरली जातील.

MPSC ‘Nipun Setu’ Scheme | Sarkarnama

व्याप्ती वाढली

यापूर्वी MPSC मार्फत केवळ ५३ संवर्गांसाठी परीक्षा घेतली जात होती. आता राज्य सरकारने ही व्याप्ती वाढवून १०३ संवर्ग तयार केले आहेत.

MPSC ‘Nipun Setu’ Scheme | Sarkarnama

प्रतीक्षा यादी

एका विभागासाठी परीक्षा दिल्यानंतर, जर उमेदवार तिथे निवडला गेला नाही किंवा दुसऱ्या विभागातील समकक्ष पद रिक्त असेल, तर पुन्हा परीक्षा न घेता प्रतीक्षा यादीतील (Waiting List) उमेदवारांना संधी दिली जाईल.

MPSC ‘Nipun Setu’ Scheme | Sarkarnama

NEXT: पुण्यात धावणार 6 डब्यांची मेट्रो; सर्वच मार्गांच्या कामासाठी ठरली डेडलाईन

येथे क्लिक करा