Vijaykumar Dudhale
प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्म 10 मे 1954 रोजी मुंबईत झाला. प्रकाश हे नाव त्यांचे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील सिद्धार्थ विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे
आंबेडकर हे 1994 पर्यंत भारतीय रिपब्लिकन पक्षात हाेते. मात्र, त्यांनी 4 जुलै 1994 रोजी भारिप बहुजन महासंघाची स्थापना केली. राजकारणात त्यांनी अकोला पॅटर्न राबविला. त्या पॅटर्नच्या माध्यमातून 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये भारिपचे आमदार निवडून आले.
प्रकाश आंबेडकर हे 1990 ते 1996 या दरम्यान राज्यसभेचे खासदार होते. त्यानंतर 1998 मध्ये अकोल्यातून लोकसभेवर निवडून गेले, ते 1999 पर्यंत खासदार होते. त्यापुढील 1999 ते 2004 या पंचवार्षिकमध्येही त्यांनी अकोल्याचे लोकसभेवर प्रतिनिधित्व केले.
आंबेडकर यांनी 2018 मध्ये वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापना केली. जवळजवळ 100 लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडीसोबत आल्या होत्या. लोकसभेच्या 2019 मधील निवडणुकीत वंचित आणि एमआयएम युतीने महाराष्ट्रातील संपूर्ण 48 जागा लढवल्या होत्या. एआयएमचा एकमेव उमेदवार छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आला.
प्रकाश आंबेडकर यांनी 2019 मध्ये अकोल्यासह सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला.
मार्च 2019 मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी आपला भारिप बहुजन महासंघ हा वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेससोबत त्यांची अजून चर्चा सुरू आहे.
R
IIT मद्रासमधून B.Tech अन् पहिल्याच प्रयत्नात 16वा क्रमांक मिळवत UPSC उत्तीर्ण