मराठीच्या रक्षणासाठी झगडणारे शिलेदार: जाणून घ्या डॉ. दीपक पवार यांच्याबद्दल

Rashmi Mane

मराठीसाठी झगडणारे डॉ. दीपक पवार

त्रिभाषा सूत्राविरोधात राज्यभर चळवळ उभी करणारे कार्यकर्ते!

Deepak Pawar | Sarkarnama

त्रिभाषा सूत्राचा निर्णय काय होता?

16 एप्रिल 2025 रोजी शिक्षण विभागाने 1ली ते 5वीपर्यंत हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केली होती. या निर्णयाला तीव्र विरोध झाला.

Deepak Pawar | Sarkarnama

निर्णय मागे घेण्यात आला!

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने दोन्ही शासन निर्णय रद्द केले.
हा लोकशक्तीचा आणि अस्मितेचा विजय होता.

Deepak Pawar | Sarkarnama

या आंदोलनाचे प्रमुख चेहरा

मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष. मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख.
25+ वर्षांचा अध्यापन आणि भाषिक चळवळीतील अनुभव.

Deepak Pawar | Sarkarnama

मराठीसाठी सतत सक्रिय

मराठी शाळा, भाषा आणि संस्कृतीसाठी चळवळींचं नेतृत्व करण्यात पवार नेहमीच सक्रिय होते. लेखक, पत्रकार, वक्ता, भाषांतरकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची ओळख होती.

Deepak Pawar | Sarkarnama

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय भूमिका

महाराष्ट्र शासनात विशेष कार्यकारी अधिकारी. ग्लोबल इंडिया नेटवर्कचे सदस्य.
भारतीय भाषांच्या सबलीकरणासाठी मंचाचे संस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे.

Deepak Pawar | Sarkarnama

सन्मान आणि पुरस्कार

  • बाळकृष्ण गणेश ढवळे पुरस्कार

  • माधव जूलियन मराठी भाषा प्रचारक पुरस्कार

  • मराठी भूषण पुरस्कार

  • उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार (2020)

  • कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार (2021)

Deepak Pawar | Sarkarnama

Next : सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता; 8 वा वेतन आयोग अद्याप अधांतरीच का? 

येथे क्लिक करा