Pankaj Ashiya: अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी कोण? अनेक नावांची चर्चा, अखेर 'या' अधिकाऱ्याचं नाव फायनल...

सरकारनामा ब्यूरो

पंकज आशिया

महायुतीचे सरकार आल्यापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशातच गुरुवारी (ता.6) 8 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निघाले. यातचं एक नाव आहे पंकज आशिया यांचे.

Pankaj Ashiya | sarkarnama

जिल्हाधिकारी

24 जुलै 2023 पासून यवतमाळचे जिल्हाधिकारी असलेले पंकज हे आता अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आहेत.

Pankaj Ashiya | sarkarnama

2016 बॅचचे IAS अधिकारी

पंकज आशिया हे 2016 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत.

Pankaj Ashiya | sarkarnama

उपविभागीय अधिकारी

याआधी ते नाशिकमध्ये उपविभागीय अधिकारी, तसेच जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

Pankaj Ashiya | sarkarnama

अनेक नावाची चर्चा

अहिल्यानगरचे यापूर्वीचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सोमवारी (ता.3) पदभार सोडला. यानंतर नगरच्या जिल्हाधिकारी पदासाठी अनेक नावांची चर्चा होत होती.

Pankaj Ashiya | sarkarnama

'ई-गर्व्हनन्स' उपक्रम

यवतमाळ येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना शासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता यावी यासाठी 'ई-गर्व्हनन्स' उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले होते.

Pankaj Ashiya | sarkarnama

अभिप्राय कक्षा'ची स्थापना

ई-गर्व्हनन्स भाग म्हणून नगरपालिका आणि भूमिअभिलेख कार्यालयात 'अभिप्राय कक्षा'ची स्थापना त्यांनी केली होती. यामुळे ते खूप चर्चेत होते.

Pankaj Ashiya | sarkarnama

शेती क्षेत्रात महत्वाचे योगदान

जिल्ह्यातील शेती क्षेत्राच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. पंकज आशिया यांच्या पुढाकाराने यवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले.

Pankaj Ashiya | sarkarnama

NEXT : काँग्रेसच्या सद्भावना यात्रेस मस्साजोगमधून प्रारंभ, देशमुख कुटुंबीय सहभाग

येथे क्लिक करा...