Rashmi Mane
इंजिनिअरिंग आणि M.Sc शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी खास संधी!
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2025, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत.
या इंटर्नशिपसाठी B.E./B.Tech (Final Year)ला CGPA किमान 7.5 असावा. तर M.Sc (Physics/Chemistry) – प्रथम वर्षात 75% मार्क असणे आवश्यक तर दुसऱ्या वर्षात शिकत असणारे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
अर्जदाराचे वय 20 जुलै 2025 ला 25 वर्षांपेक्षा कमी असावे. त्यापेक्षा अधिक वय असलेल्या अर्जदारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
दरमहिन्याचा स्टायपेंड 5,000 रुपये तर छात्रांना सहा महिन्यांसाठी मानधन दिलं जाईल.
फॉर्म डाउनलोड करा आणि DRDO/NSTL मध्ये फॉर्म आणि या ईमेलवर hrd-nstl@gov.in डॉक्युमेंट्स ईमेल करा. फक्त ईमेलद्वारेच अर्ज स्वीकारले जातील.
इंटर्नशिप 1 ऑगस्ट 2025 ला सुरू होईल आणि ती विशाखापट्टणम येथील डीआरडीओच्या नेव्हल सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी (एनएसटीएल) येथे आयोजित केली जाईल.
इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन/ऑफलाइन मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. फक्त निवडलेल्या विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे सूचित केले जाईल.