Roshan More
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिमोर-लेस्टे या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्टे'ने सन्मानित करण्यात आले.
तिमोर-लेस्टे हा देश ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीच्या अगदी जवळ आहे. राष्ट्रपतीमुर्मू यांना त्यांच्या सामाजिक सेवेतील कामगिरी आणि शिक्षण, सामाजिक कल्याण आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या समर्पणासाठी हा देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला.
तिमोर-लेस्टेचे अध्यक्ष जोस रामोस-होर्टा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिमोर-लेस्टेचे पंतप्रधान काय राला झानाना गुस्माओ यांची भेट घेतली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान गुस्माओ या दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. सांस्कृतिक देवाणघेवाण, रेडिओ प्रसारण आणि पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा सूट या क्षेत्रांमध्येही तीन करार या नेत्यांमध्ये झाले.
भारताचा दूतावास लवकरच तिमोर-लेस्टे येथे सुरू होणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि सहकार्य संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.