Ganesh Sonawane
शिक्षणापासून वंचित राहिलेली तरुण पिढी सहज मिळणाऱ्या गांजा आणि अफूच्या आहारी जात असून, दुसरीकडे शहरी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम तरुणाई महागड्या अंमली पदार्थांच्या सवयीने वेढली जात आहे.
मित्राखातर वा मौजमजेतून सुगंधी पानमसाला आणि सिगारेटच्या व्यसनाची भुरळ, नंतर दारु अमली पदार्थांच्या जीवघेण्या व्यसनापर्यंत घेऊन जाते.
अंमली पदार्थांचे सेवन केवळ शरीरावर घातक परिणाम करत नाही, तर व्यक्तीच्या सामाजिक नातेसंबंधांवर आणि कौटुंबिक जीवनावरही परिणाम करते. नशा फुकट करता येत नसल्याने आर्थिक नुकसानही होते.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सुमारे सव्वाशे कोटीची लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये किमान २५ ते ३५ कोटी लोक कोणत्या ना कोणत्या नशेच्या गर्तेत अकडलेले आहेत.
सर्वाधिक १५ ते २० कोटी लोक मद्याच्या अमलाखाली असल्याचे या सर्वेक्षणातून दिसते.
नशेच्या आहरी गेलेली तरुणाई आपली गरज भागवण्यासाठी गुन्हेगारीकडे वळते.
मद्य, गांजा, मादक द्रव्ये, झोपेच्या गोळ्या, हुंगण्याची नशा, कोकेन, उत्तेजक द्रव्ये, भास निर्माण करणारे द्रव्य असे वेगवेगळ्या अमली पदार्थांची नशा तरुणाईला आहे. १० ते १७ वयोगटातील 1 कोटी 48 लाख तरुण नशेच्या गर्तेत आहेत.
१८ ते ७५ वयोगटातील २० कोटीहुन अधिक लोक या वेगवेगळ्या अमली पदार्थांच्या गर्तेत अडकलेली आहेत.