Pradeep Pendhare
मेफेड्रोनचे (एमडी ड्रग्ज) सातपेक्षा अधिक कारखाने उद्धवस्त केले, तर 450 कोटी रुपयांची एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले.
एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्यांविरोधात 191 गुन्हे नोंदवत 275 व्यक्तींना अटक करण्यात आली.
अमलीपदार्थ सेवन करणाऱ्या 5090 व्यक्तींविरोधात अटकेची कारवाई झाली.
गांजाशी संबंधित 538 प्रकरणे नोंदवली गेली असून, यात 561 व्यक्तींना अटक करत 2 कोटी 56 लाखांचा गांजा जप्त केला.
चरसशी संबंधित 31 प्रकरणे नोंदवली गेली असून, 37 जणांना अटक करत 12 कोटी 89 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
हेरॉईनशी संबंधित 28, तर कोकेनशी संबंधित 12 गुन्हे नोंदवले गेले. यात अनुक्रमे 40 व 18 जणांना अटक झाली.
पोलिसांनी 7 कोटी 41 लाखांची हेरॉईन, तर 12 कोटी 30 लाख रुपयांचे कोकेन जप्त केले.
भारतात 2010 मध्ये एमडी ड्रग्जची विक्री प्रचंड वाढली होती. आता कलम 328 नुसार विषारी द्रव्य देणे वा विक्री करणे प्रतिबंध आहे.