सरकारनामा ब्यूरो
जया किशोरी हे नाव आज सगळ्यांनाच माहित आहे. त्यांची भजने आणि मोटिवेशनल स्पीच सर्व वयोगटातील लोक आवडीने पाहतात...
त्यांच्या फोलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. मात्र आज त्यांना एका हँडबॅगमुळे खूप ट्रोल केलं जात आहे.
जया किशोरी यांचा जन्म राजस्थानमधील सुजानगड येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील शिव शंकर शर्मा आणि आई सोनिया शर्मा,लहान बहीण चेतना शर्मा. जया किशोरी ह्या त्यांच्या कुटुंबाबरोबर कोलकातामध्ये राहतात.
जया यांचं प्राथमिक, महाविद्यालय शिक्षण हे महादेवी बिर्ला वर्ल्ड अकादमी येथे आणि बी.कॉमचं शिक्षण कोलकाता येथून झालं.
जया यांचं भजन आध्यात्मिकतेचा प्रवास लहानपणापासूनच सुर झाला. किशोरी यांनी शिव तांडव स्तोत्र, शिवपंचाक्षर स्तोत्र, दरिद्रय दहन शिव स्तोत्र यांसारखी अनेक स्तोत्रे कृष्णाचा गोष्टी त्यांचे आजोबा सांगायचे.
जया किशोरी यांचे खरे नाव जया शर्मा आहे. श्रीकृष्णावरील श्रद्धा आणि प्रेमामुळे त्यांना या नावाने ओळखले जाते. त्यांच्या गुरूंनी जया शर्मा यांना किशोरी ही पदवी दिली.
सोशल मीडियावर सध्या त्यांच्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या ट्रॉली आणि हँडबॅग घेऊन जाताना दिसत आहेत. ही हँडबॅग डीओर ब्रँडची असून त्याची किंमत सुमारे 2 लाख रुपये आहे.
ही बॅग प्राण्यांच्या कातडीची असल्यांने त्या सध्या वादाचा भोवऱ्यात सापडल्या आहेत. यावर जया यांनी स्पष्टीकरण दिलं. सनातनींना नेहमी टार्गेट केले जात. मी एक सामान्य मुलगी आहे. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर तुम्ही ती विकत घेऊ शकता.