सरकारनामा ब्यूरो
प्रियांका बाजपेयी या उत्तर प्रदेशमध्ये 'डीएसपी' म्हणून कार्यरत आहेत.
प्रियांका या लखनऊ येथील रहिवासी आहेत.
प्रियांका यांनी लखनऊ विद्यापीठामधून सार्वजनिक प्रशासनमध्ये (पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन) मास्टर्स केले आहे. मास्टर्सनंतर त्यांनी पीएचडी केली.
प्रियांका हा अभ्यासात नेहमीच अव्वल राहिल्या आहेत. मास्टर डिग्री घेत असताना त्यांनी लोक प्रशासन विषयात सुवर्णपदक मिळवले.
प्रियांकांनी लोक प्रशासनाचं शिक्षण घेत असताना सिव्हिल सर्व्हिसेच्या परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले.
प्रियांका या 2017 मध्ये उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये 6वा रँक मिळवत DSP बनल्या.
प्रियांकांनी तिसऱ्यांदा UPPCS परिक्षेची दिली आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. तेव्हा त्यांची नियुक्ती शुल्क निरीक्षक (एक्साईज इन्स्पेक्टर) म्हणून करण्यात आली.
शुल्क निरीक्षक म्हणून प्रियांकांची निवड झाली नसती तर त्यांनी पीएचडीनंतर प्रोफेसर होण्याचं ठरवल होतं. प्रियांका या सोशल मीडियावर सक्रीय असतात.