सरकारनामा ब्यूरो
सध्या जगात एकाच नावाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे, ते म्हणजे दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांच्या मुलीचे ठेवण्यात आलेले नाव.
प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांनी त्यांच्या मुलीचे नाव 'हिंद' असे ठेवले आहे. या नावाचं भारताबरोबर काय कनेक्शन आहे जाणून घेऊयात...
क्राउन प्रिन्स यांनी त्यांच्या मुलीचे नाव घोषित केल्यानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये मुलीचे नाव अरबी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिले आहे.
सौदी अरेबियामध्ये 'हिंद' हे नाव काॅमन असल्याचे म्हटले जाते. हे नाव प्रामुख्याने मुलीसाठी वापरले जाते.
मुलीचे नाव हिंद ठेवण्यामागे एक कारण आहे, 'हिंद' हे नाव ठेवल्याने त्या मुलीला सुख आणि समृद्धी भरभरुन मिळते. असे सौदी अरेबियामध्ये मानले जाते.
हिंद या नावाचा अर्थ समृद्धी किंवा आशीर्वाद असा होतो.
'सिंधू' या संस्कृत शब्दावरून भारतामध्ये हिंद शब्दाचा वापर केला आहे. ज्याचा अर्थ 'नदी' असा होतो.